नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावर विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहेत. मायावती यांनी मंगळवारी सीएएवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. जर अदनान सामीला भारतात पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो तर पाकिस्तानी मुस्लिमांना सीएए अंतर्गत आश्रय का देऊ शकत नाहीत. असा सवाल त्यांनी केला आहे.

जर मूळचा पाकिस्तानी असणऱ्या अदनान सामीला भारतात पद्मश्री पुरस्कार मिळू शकते तर पाकिस्तानात अत्याचार होत होत असलेल्या पाकिस्तानी मुस्लिमांना हिंदू, शीख आणि ख्रिश्चन यांच्याप्रमाणे सीएए अंतर्गत आश्रय का देऊ शकत नाहीत. केंद्र सरकारने पुन्हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर फेरविचार केला तर बरे होईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अदनान सामीला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसप्रमाणेच महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील विरोध केला होता. अदनान सामी यांचा जन्म लंडनमध्ये झाला असून, त्यांचे वडील पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये वैमानिक होते. अदनाननं २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं.