मॅगी सुरक्षित असल्याबाबतची कुठलीही माहिती सादर न केल्याने गुजरातेत या उत्पादनावरची बंदी आणखी एक महिन्यानी वाढवण्यात आली आहे. गुजरातच्या अन्न व औषधे नियंत्रण प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. नेसले कंपनी मॅगीची उत्पादक आहे.
राज्याचे अन्न व औषध नियंत्रक आयुक्त एच. जी. कोशिया यांनी सांगितले की, मॅगीबाबत अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक माहिती न पुरवण्यात आल्याने बंदी एक महिना वाढवण्यात आली आहे. मॅगी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ नमुने असुरक्षित असल्याच्या प्रकरणी अहवाल मागवला होता पण
नेस्ले कंपनीने तो सादर केलेला
नाही.