News Flash

सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या...

(संग्रहित छायाचित्र)

अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात.

व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 1:54 pm

Web Title: mha permits entry of all international travellers except on a tourist visa to enter by air or water routes dmp 82
Next Stories
1 भारताचा मोठा विजय! कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठीचं विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर
2 भाजपाचा जाहीरनामा : …तर बिहारच्या जनतेला करोना लस मोफत देऊ
3 देशात ६८ लाख नागरिक करोनामुक्त, २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना डिस्चार्ज
Just Now!
X