News Flash

मिग २७ विमानांची निवृत्ती

रशियन बनावटीचे हे विमान असून त्याचे इंजिन शक्तिशाली होते.

जोधपूर  : वीस वर्षांपूर्वी १९९९ च्या कारगिल युद्धात मोठी भूमिका पार पाडणारी मिग २७ विमाने शुक्रवारी सेवेतून काढून घेण्यात आली. या विमानांनी शुक्रवारी येथील विमानतळावरून शेवटचे उड्डाण केले.

भारतात ‘बहादूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानांनी शांतता व युद्धकाळात मोठी भूमिका पार पाडली असून कारगिल युद्धात शत्रूच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आघाडीवर होती. ‘ऑपरेशन पराक्रम’मध्ये ती सहभागी होती. मिग २७ विमानांचा वापर काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सरावांमध्ये करण्यात आला होता. रशियन बनावटीचे हे विमान असून त्याचे इंजिन शक्तिशाली होते. त्याच्या पंखांची भौमितिक रचना ही वैमानिकाला पंखाचा कोन सहज बदलता येईल अशा तऱ्हेने केलेली होती. आता ही विमाने ३१ मार्च २०२० रोजी हवाई दलाच्या संग्रहालयात ठेवली जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 3:56 am

Web Title: mig 27 fighters retired zws 70
Next Stories
1 कलकत्ता पानशौकिनांचा रसभंग
2 कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वादग्रस्त विधानावर पडसाद
3 ‘भारतातील मुस्लिमांच्या दर्जावर परिणाम’
Just Now!
X