सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीनसोबतच्या ४६ अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीच्या आर्थिक मार्गिकेला (इकॉनॉमिक कॉरिडॉर) सुरक्षा पुरवण्यासाठी या भागातील गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये ब्रिगेड स्तरावरील लष्करी जाळे उभारण्याची योजना पाकिस्तान आखत आहे.चीनसोबत एकमेव महत्त्वाचा दुवा असलेले उत्तरेकडील हे क्षेत्र सीपीईसीच्या जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आहे.