News Flash

जॉर्जियामध्ये अमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

अमेरिकेमध्ये ९ जणांना घेऊन जाणा-या लष्कराचं एक मालवाहू विमान क्रॅश झाल्याचं वृत्त आहे. सी-130 'हर्क्यूलस' हे मालवाहू विमान बुधवारी (दि.२) सवान्ना विमानतळाजवळ...

अमेरिकेमध्ये ९ जणांना घेऊन जाणा-या लष्कराचं एक मालवाहू विमान क्रॅश झाल्याचं वृत्त आहे. सी-130 ‘हर्क्यूलस’ हे मालवाहू विमान बुधवारी (दि.२) सवान्ना विमानतळाजवळील रस्त्यावर आंतरराष्ट्रीय वेळेनुसार जवळपास रात्री ९ वाजता अपघातग्रस्त झालं. यामध्ये विमानातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान जॉर्जियाहून अॅरिझोनाच्या टस्कन येथे जात होतं. हे विमान जवळपास ५० वर्ष जुनं होतं अशी माहिती आहे. ‘प्यूटरे रिको एयर नेशनल गार्ड’चं हे विमान होतं आणि विमानातील सर्व प्यूटरे रिको येथीलच होते अशी माहिती आहे. मृतकांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसंच अपघातामागे नेमकं कारण काय होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 12:41 pm

Web Title: military plane crashes in georgia 9 believed to dead
Next Stories
1 पंतप्रधान पीक विमा योजनेत खासगी विमा कंपन्या मालामाल: राहुल गांधी
2 चीनची दादागिरी रोखण्यासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येणार ?
3 प्रेमी युगूलाने पळून जाऊन लग्न केले; गावातील पंचायतीने थेट प्रेमविवाहावरच बंदी घातली
Just Now!
X