गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  हे विमान उडवण्याचे तंत्रशुध्द प्रशिक्षण असलेली व्यक्तीनेच या विमानाचे अपहरण केल्याचा अंदाज मलेशिया सरकारने वर्तविला आहे.
मलेशियन विमानाच्या अपहरणाबाबत जूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मागण्या समोर आलेल्या नाहीत. तसेच हे विमान नेमके कुठे आहे, याचाही पत्ता लागलेला नाही, असे मलेशियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र, विमानाचे अपहरण झाल्याचा प्रकार जास्त वेळ लपवता येऊ शकत नसल्याचे अधिकारी म्हणाला. यासंबंधी गुप्तता बाळगण्याचे आदेश असल्यामुळे यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास तपास यंत्रणांच्या अधिका-यांनी नकार दिला.
सात दिवसांपूर्वी २३९ प्रवाशांना घेऊन आकाशात झेपावलेले मलेशिया एअरलाइन्सचे विमान क्लालालंपूरहून बिजींगला जात होते. चीनने आपले दहा उपग्रह आठ नौका आणि ३ विमाने या शोधमोहिमेत लावली आहेत. मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यासह थायलंडच्या समुद्रात शोधमोहीम राबविली जात आहे. काही विमाने भारताच्या किनाऱ्यापर्यंत येवून गेली आहेत. या शोधमोहिमेला जगभरातील तज्ज्ञ आवश्‍यक ती मदत करत आहेत.