News Flash

खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पठाणकोटमध्ये पोस्टर्स

या प्रकारानंतर गुरूदासपुरमधील राजकारण तापल्याचे दिसत आहे

अभिनेते व भाजपाचे पंजाबमधील गुरूदासपुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सनी देओल हे बेपत्ता असुन, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये लावण्यात आले आहेत.

”गुमशुदा की तलाश MP Suuny Deol” असं लिहिलेलं असल्याचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी जागोजागी लावण्यात आले आहेत. या पोस्टर लावण्यात आल्यानंतर गुरूदासपुरमधील राजकारण तापल्याचे दिसत आहे.

भाजपाने लोकसभा निवडणुकीच्यावेळी गुरुदासपुर येथून सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. देओल यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्याविरोधात ही निवडणूक लढवली व त्यांचा पराभव केला होता.यापूर्वी गुरुदासपूर येथून भाजपाचे उमेदवार अभिनेते-राजकारणी विनोद खन्ना खासदार होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी भाजपा नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो त्यांना सनी देओल यांच्या रुपाने मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 12:56 pm

Web Title: missing posters of sunny deol bjp mp from gurdaspur constituency msr 87
Next Stories
1 भटक्या कुत्र्याला वाचवताना चार मित्रांचा जीव गेला, SUV चा भीषण अपघात
2 वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिरात आता भाविकांसाठी ‘ड्रेसकोड’
3 इच्छा व्यक्त केली, तरी मला हैदराबाद विमानतळावरच अटक होईल -ओवेसी
Just Now!
X