भाषणातील गंभीर चुकीसह ते वाचून दाखवल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अडचणीत सापडल्या आहेत. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका करताना एनडीए शब्द वापरण्याऐवजी त्यांनी यूपीए शब्द वापरल्याने उपस्थितांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खुद्द सोनिया गांधी यांनाही ही चूक लगेचच लक्षात आली नाही आणि त्या हातातील कागदावरील भाषण तशाच पुढे वाचत राहिल्या.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी गेल्या दोन वर्षात केंद्रातील यूपीए सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत, असे वाक्य वाचून दाखवले. प्रत्यक्षात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारवर टीका करायची होती. पण एनडीएऐवजी यूपीए शब्द वापरल्यामुळे भाषणातील त्यांच्या वाक्याचा अर्थच बदलला.
इंग्रजीत लिहिलेले भाषण सोनिया गांधी वाचून दाखवत होत्या. असे असतानाही भाषणातील चूक त्यांच्या लक्षात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.