News Flash

मोबाईलवरील टू जी इंटरनेट सेवा महागली

भारती एअरटेल, आयडिय़ा सेल्युलर आणि व्होडाफोन या प्रमुख मोबाईल कंपन्यांनी आपल्या २जी इंटरनेट सेवेच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

| October 16, 2013 02:53 am

भारती एअरटेल, आयडिय़ा सेल्युलर आणि व्होडाफोन या प्रमुख मोबाईल कंपन्यांनी आपल्या २जी इंटरनेट सेवेच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार २जी इंटरनेट सेवा वापरणा-या ग्राहकांना यापुढे विशिष्ट प्लान्सवर काही मर्यादेपर्यंतच डाऊनलोडची सुविधा उपलब्ध असणार आहे, तसेच या प्लान्सची वैधता आधीपेक्षा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे १ जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट युजर्सना जवळपास २५ टक्के जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
व्होडाफोन, एअरटेल आणि आयडिया या तीनही कंपन्या बाजारातील जवळपास ५३ टक्के ग्राहकांना मोबाईल सेवा पुरवतात. या कंपन्यांनी इंटरनेट डाऊनलोड आणि वैधता प्लान्समध्ये बदल केल्याचं त्यांच्या संकेतस्थळांवर नमूद करण्याच आलं आहे.
यापूर्वी १ जीबी (किंवा १०२४ एमबी) इंटरनेट युसेजसाठी रूपय़े १२५ मोजावे लागत होते, त्यामध्ये बदल करून आता ५२५ एमबी करण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी भारती एअरटेलसाठी रूपये १५६ आणि आयडिया सेल्युलरसाठी १५४ रूपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम पूर्वीपेक्षा २५ टक्के अधिक आहे. तर व्होडाफोन ग्राहकांना ३० दिवसांसाठी रूपये १५५ मोजावे लागणार आहेत.
मुंबईत १ जीबी डाऊनलोडसाठी भारती एअरटेलच्या ग्राहकांना रूपये १५४ आणि आयडिया सेल्यलर ग्राहकांना रूपये १५५ मोजावे लागणार आहेत, ज्याची वैधता ३० दिवस असेल.
वर्षभरापेक्षा कमी कालावधीमध्ये टू जी इंटरनेटच्या दरांमध्ये या कंपन्यांनी ही दुस-यांदा वाढ केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2013 2:53 am

Web Title: mobile internet data tariff rates hiked by bharti airtel idea cellular vodafone
टॅग : Technology News
Next Stories
1 पंतप्रधान आपली जबाबदारी कशी झटकू शकतात? – भाजप
2 नारायण साईच्या शोधात पोलिसांचे दिल्लीत छापे
3 रुपया घसरणीने परदेशात मालमत्ता खरेदीची लाट!
Just Now!
X