22 September 2020

News Flash

‘एनएसजी’तील समावेशाबाबत मोदींचा पुतिन यांना दूरध्वनी

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला.

एनएसजीमध्ये प्रश मिळण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांना दूरध्वनी केला. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद आणि एनएसजीमध्ये भारताला प्रवेश मिळावा यासाठी रशियाचा पाठिंबा आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला. दोन्ही देशांमध्ये सहकार्य असलेल्या मुद्दय़ांवरच ही चर्चा केंद्रित होती, असे क्रेमलिनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एनएसजी बैठकीपूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचा मोदी यांचा प्रयत्न राहणार आहे. एनएसजीमध्ये भारताला प्रवेश देण्यास चीनने विरोध दर्शविला आहे, तर अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे, त्या पाश्र्वभूमीवर मोदी-जिनपिंग भेट महत्त्वाची ठरणार आहे. मोदी आणि पुतिन यांचीही लवकरच भेट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 2:53 am

Web Title: modi dials putin as china looks to delay nsg bid 2
टॅग Putin
Next Stories
1 ‘आयसीएचआर’ची पहिल्या संशोधन प्रकल्पाला मान्यता
2 मथुरा हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली
3 ओरलँडोतील हल्लेखोर ओमर मटीन खिलाफतचा सैनिक?
Just Now!
X