11 August 2020

News Flash

पंतप्रधान मोदी ‘ब्रॅण्ड इंडिया’ गाजविणार

जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांनी भारताविषयी तयार केलेली उत्तम प्रतिमा अर्थात ‘ब्रॅण्ड इंडिया’चा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरअखेरीस न्यूयॉर्क येथे होणाऱ्या कार्यक्रमात करून घेतील,

| August 30, 2014 12:41 pm

जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांनी भारताविषयी तयार केलेली उत्तम प्रतिमा अर्थात ‘ब्रॅण्ड इंडिया’चा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरअखेरीस न्यूयॉर्क येथे होणाऱ्या कार्यक्रमात करून घेतील, असे मत भाजपाचे खासदार राज्यवर्धन सिंग राठोड यांनी भारतीय-अमेरिकनांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.
२८ सप्टेंबर रोजी न्यूयॉक येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार असून या ऐतिहासिक भाषणात भारताबाबत जगभरात असलेल्या चांगल्या प्रतिमेचा अर्थात ‘ब्रॅण्ड इंडिया’चा लाभ उठविण्याविषयी ते प्रामुख्याने बोलतील असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या परदेशी शाखेचे निमंत्रक विजय जॉली आणि राज्यवर्धन सिंग राठोड असे दोघेजण अमेरिकेतील दहा शहरांतील लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले आहेत. भारतीय-अमेरिकन नागरिकांनी भारतीय लोकांच्या समूहातर्फे न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या नियोजित सभेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होऊन पाठिंबा द्यावा यासाठी राठोड आणि जॉली भारतीय-अमेरिकनांच्या भेटीगाठी घेत आहेत. आतापर्यंत जॉली यांनी लॉस एंजेलिस, डलस, ह्य़ूस्टन, अटलांटा, शिकागो, न्यूयॉर्क, नेवार्क, फिलाडेल्फिया आणि वॉशिंग्टन डीसी अशा दहा शहरांना भेटी दिल्या आहेत. त्याशिवाय जॉली व राठोड यांनी अनेक धोरणकर्ते, कायदेतज्ज्ञ तसेच काँग्रेसमन इड रॉईस आदींच्या भेटी घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2014 12:41 pm

Web Title: modi slated to give speech at madison square garden
टॅग Narendra Modi
Next Stories
1 दूरसंचार घोटाळा : एअरसेल-मॅक्सीस व्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल
2 बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आयएएस जोडप्यावर वॉरण्ट
3 इबोलाने १,५०० बळी घेतल्यामुळे सावधानतेचा इशारा
Just Now!
X