आजपासून प्रत्येक भारतीयाला आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचे आहे. केवळ लोकलसाठी व्होकलच बनायचे नाहीतर लोकल वस्तूंची खरेदी करायची आहे व त्यांचा अभिमान बाळगून प्रचारही करायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आज भारतीयांना आवाहन केले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, करोना संकटाने आपल्याला लोकल मॅनिफॅक्चरिंग, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन यांचे महत्व बरोबर समजवले आहे. संकट काळात लोकलनेच आपल्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. आपल्याला या लोकलनेच वाचवले आहे. लोकल केवळ गरजच नाही तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. वेळेने आपल्याला शिकवलं आहे की, लोकलला आपल्याला आपला जीवनमंत्र बनवावेच लागेल. तुम्हाला आज जे ग्लोबल ब्रॅण्ड वाटतात. ते देखील कधीतरी असेच लोकल होते. परंतु जेव्हा तेथील लोकांनी त्यांचा वापर सुरू केला, त्यांचा प्रचार सुरू केला, त्यांची ब्रॅण्डींग केली, त्याचा अभिमान बाळगला तेव्हा ते प्रॉडक्ट लोकल पासून ग्लोबल बनले. त्यामुळे आजापासून प्रत्येक भारतीयाला आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचे आहे.

केवळ लोकलसाठी व्होकलच बनायचे नाहीतर लोकल वस्तूंची देखील खरेदी करायची आहे व त्यांचा अभिमान बाळगून प्रचारही करायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपला देश असं करू शकतो. असं देखील ते यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.   या अगोदर पंतप्रधान मोदींनी  स्वावलंबी भारत हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं तसेच, भारताच्या अभियानांचा प्रभाव जगावर पडतोच असं देखील सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. या वेळी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत, २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.  हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिक पॅकेज जाहीर करताना प्रत्येकाचा विचार करण्यात आल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.