प्रसिद्ध परफ्युम डिझायनर मोनिका रमेश घुरडे हिच्यावर हत्येपूर्वी बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी राजकुमार सिंहने पोलीस चौकशीदरम्यान याबाबतची कबुली दिली आहे. बलात्कारापूर्वी आपण मोनिकाला तीन पॉर्न क्लिप्स दाखवल्या आणि तिच्यावर बलात्कार केला, असे त्याने पोलिसांना सांगितले. विवस्त्र आणि हातपाय बांधलेल्या स्थितीत मोनिकाचा मृतदेह मिळाल्यामुळे सुरूवातीपासूनच बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत होता.
राजकुमार सिंह हा मोनिकाच्या अपार्टमेंटमध्येच सुरक्षारक्षक होता. पण काही दिवसांपूर्वी त्याला मोनिका आणि इतर रहिवाशांच्या तक्रारीवरून काढून टाकण्यात आले होते. त्याचाच राग मनात ठेऊन राजकुमारने मोनिकाची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतरच्या पोलीस चौकशीतही राजकुमारने काही धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार चोरी करण्याच्या उद्देशाने घुरडेंच्या घरात घुसला होता. चाकूचा धाक दाखवून त्याने घुरडे यांच्याकडून एटीएम व पिन नंबर घेतला. त्यानंतर घुरडे यांची पॉर्न क्लिप बनवून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने त्याने मोनिका यांना कपडे काढायला सांगितले. मात्र, घुरडे यांनी त्यावेळीच आरडाओरडा करण्या सुरूवात केली. त्यांचा आरडाओरडा थांबविण्यासाठी राजकुमारने त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली. यामध्ये मोनिका घुरडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
मोनिकाचे वडील हे न्यायाधीश होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. घरचे कुटुंबीय मूळचे अमरावती येथील असून वडिलांच्या नोकरीनिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले. तिने सुरुवातील छायाचित्रकार म्हणून करिअर केले. परंतु तिला सुगंध ओळखण्याची आवड असल्याने तिने २००९ मध्ये परफ्युम डिझायनर म्हणून करिअर केले आणि त्यात तिला प्रचंड यश मिळाले. २०११ मध्ये ती गोव्याला गेली आणि तेथेच स्थायिक झाली. एका भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये ती राहायची. नागपुरात तिचे मामा राहतात. तिच्या वडिलांचे गोकुळपेठ परिसरात घर असून त्या निमित्ताने ती नागपुरात यायची. काही महिन्यांपूर्वी ती नागपुरात येऊन गेलेली होती. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तिच्या शेजारी राहणारी एक अमेरिकन महिला तिला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिचे घर बंद होते आणि आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्या महिलेकडे असलेल्या मोनिकाच्या घराच्या बनावट चावीने दार उघडले असता बेडवर मोनिकाचे हातपाय बांधलेले होते आणि ती मृतावस्थेत दिसली. त्यानंतर ताबडतोब महिलेने गोवा पोलिसांना माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2016 रोजी प्रकाशित
हत्येपूर्वी मोनिकाला पॉर्न क्लिप दाखवून बलात्कार केल्याची मारेकऱ्याची कबुली
राजकुमार सिंह हा मोनिकाच्या अपार्टमेंटमध्येच सुरक्षारक्षक होता.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 12-10-2016 at 08:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monika ghurde murder nursing grudge sacked guard returned to rape kill perfumer