भारतात कोविड १९ रुग्णांची संख्या रविवारी १,१०,९६,७३१ झाली असून एका दिवसात १६,७५२ रुग्ण आढळून आले आहेत. महिनाभरात एका दिवसातील ही सर्वात रुग्णमोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात २९ जानेवारीला १८,८५५ नवीन रुग्ण सापडले होते, त्यानंतर आताचा आकडा मोठा आहे. नवीन ११३ बळी गेले असून एकूण मृतांची संख्या आता १ लाख ५७ हजार ५१ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १ लाख ६४ हजार ५११ झाली असून एकूण संसर्गित रुग्णांच्या हे प्रमाण १ .४८ टक्के आहे.

एकूण रुग्णांची संख्या आता १,०७,७५,१६९ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१० टक्के झाले आहे.  मृत्यू दर आता १.४२ टक्के झाला आहे. कोविड रुग्णांची संख्या ७ ऑगस्टला २० लाख, २३ ऑगस्टला ३० लाख, ५ सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला  ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख, २० नोव्हेंबरला ९० लाख तर १९ डिसेंबरला १ कोटी झाली होती.  २७ फेब्रुवारीअखेर  २१,६२३११०६  नमुने तपासण्यात आले असून शनिवारी ७ लाख ९५ हजार ७२३ नमुने तपासण्यात आले. ११३ नवीन बळी गेले असून त्यात महाराष्ट्रात ५१, केरळ १८, पंजाब ११ या प्रमाणे संख्या आहे.