मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सेवा काल (शुक्रवार) रात्री ठप्प झाली होती. याचा जवळपास ४० हजार युजर्सना फटका बसला. यानंतर कंपनीने आज (१७ एप्रिल) पहाटे ६ वाजून २१ मिनिटांनी याबाबत ट्विट करत सांगतिले की, काही युजर्सचे ट्विटस लोड होत नाहीत, आम्ही या समस्येवर काम करत आहोत आणि लवकरच हे दुरूस्त केले जाईल.

Downdetector.com च्या मचते शुक्रवारी ४० हजार युजर्सनी ट्विट करताना येत असलेल्या अडचणींबाबत तक्रार नोंदवली होती. दरम्यान, ट्विटर आपल्या युजर्ससाठी लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या नव्या फिचरद्वारे युजर्स आपल्या टाइमलाइनवरही युट्यूबचे व्हिडिओ पाहू शकतील. कंपनीचे म्हणणे आहे की, या नव्या फिचर मुळे युजर्सना व्हिडिओ पाहणे अधिक सोयीचे होईल.

ट्विटरच्या नव्या फिचरची टेस्टिंग सध्या अमेरिका, जपान, कॅनडा आणि सौदी अरबमध्ये केली जात आहे. या फिचरचा वापर ios युजर्स करू शकतील. अपेक्षा आहे की फिचरला लवकरच अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही नव्या फिचरची टेस्टिंग आणखी चार आठवड्यापर्यंत करणार आहोत आणि परिणाम पाहून फिचरच्या लॉन्चिंगबाबतचा निर्णय घेतला जाईल.