मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.Exit Poll 2019: फिर एक बार मोदी सरकार ?

लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

2. राज्यात पुन्हा युतीचेच वर्चस्व

राज्यात शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरणार हाच निष्कर्ष मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला. वाचा सविस्तर..

3.लोकसभा निवडणुकीने वृत्तवाहिन्यांना तारले

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) वाहिन्या निवडीचा नवा नियम, आयपीएलचे सामने, उन्हाळ्याची सुट्टी, ऑनलाइन मनोरंजनाचे वाढते पर्याय असे अडथळे असूनही लोकसभा निवडणुकीमुळे वृत्तवाहिन्यांना फायदा झाला आहे. वाचा सविस्तर..

4. मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याबद्दल तृणमूलची तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ भेटीचे वृत्तवाहिन्यांनी केलेले वार्ताकन व प्रसारण हे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. वाचा सविस्तर..

5. युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार?

२०११च्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार युवराज सिंग सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याच्या विचारात आहे. वाता सविस्तर..