मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. … हे तर अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे यश: शिवसेना

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने मतदान केले असून हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे आणि अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे आहे. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला असून त्यांचे मनापासून अभिनंदन असे म्हणत शिवसेनेने मोदी- अमित शाह यांचे कौतुक केले आहे. वाचा सविस्तर..

2. राज्यात विधानसभेसाठी युतीला अनुकूल वातावरण

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीने निर्विवाद यश मिळविल्याने पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीलाच अनुकूल वातावरण राहील, अशीच चिन्हे आहेत. वाचा सविस्तर..

3. भाजपच्या स्वबळामुळे सेनेच्या मनसुब्यांवर पाणी

लोकसभा निवडणुकीसाठी युतीला राजी होताना भाजपच्या गरजेचा फायदा उठवत जागावाटपात एक जागा जास्त हवी हा हट्ट धरून तो मान्य करण्यास शिवसेनेने भाग पाडले असले तरी आता लोकसभेत भाजपने स्वबळावर बहुमत मिळवल्याने शिवसेनेची वाटाघाटींची ताकद क्षीण होणार आहे. वाचा सविस्तर..

4. भाजप मुख्यालयात राहुल गांधींच्या पराभवाची चर्चा..

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाचा उत्साह भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी दिवसभर साजरा केला जात होता. पण, चर्चा होती ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची! वाचा सविस्तर..

5.सुरक्षा यंत्रणांना मोठे यश, मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला असून झाकीर मुसा हा सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रीय होता. वाचा सविस्तर..