मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.काश्मीरमध्ये चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

2.महाराष्ट्रातील पहिल्या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मराठीत ट्विट, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी वर्धा येथे होत असून या पार्श्वभूमीवर मोदींनी सकाळी मराठीत ट्विट केले आहे. वाचा सविस्तर..

3.राहुल यांनी वायनाडच का निवडले?

काँग्रेससाठी सुरक्षित, जवळपास निम्मे अल्पसंख्याक मतदार, केरळात असला तरी तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेला लागून असल्यानेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी केरळातील मलबार प्रदेशातील वायनाड मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

4. राजकीय जाहिरातींना रेल्वेचा चाप

रेल्वेच्या चहा कपांवर ‘मैं भी चौकीदार’च्या जाहिराती करून तिकिटांवरही पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे छापल्याच्या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली असून रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के.यादव यांनी रेल्वेच्या आवारातील सर्व राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सांगितले आहे. वाचा सविस्तर..

5.पॅन कार्ड आधारला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली

केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखी वाढवली आहे. वाचा सविस्तर..