News Flash

मुलीचा विनयभंग करणाऱ्या मौलवीला आईने मशिदीतच चोपलं

ती सर्व घटना ऐकून आईच्या तळपायातील आग मस्तकात गेली. तिने मौलवीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

मुलीचा विनयभंग करणाऱ्या मौलवीला आईने मशिदीतच चोपलं

एकीकडे कठुआ, उन्नाव, सुरत येथील बलात्कार प्रकरणांमुळे देश चिडून उठला आहे. दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या कानावर पडतात. काही लोक आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याची मागणी करताना दिसतात तर काही त्याच आरोपींची धर्माच्या नावाखाली पाठराखणही करतात. या सगळ्यात मुली खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे.

एकीकडे महिलांवर अज्ञाय होत असताना दुसरीकडे एक अशी आई आहे जिने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी मौलवीला चोपलं. सध्या एका आईचा मौलवीला चोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नक्की केव्हाचा आहे हे कळू शकलेले नाही. पण हा व्हिडिओ पाकिस्तानातील असावा असे म्हटले जात आहे.

व्हिडिओत एक महिला हातात छडी घेऊन मशिदीत घुसते आणि तिथे उभ्या असलेल्या मौलवीला मारायला सुरूवात करते. असे म्हटले जाते की, त्या महिलेच्या ८ वर्षांच्या मुलीची मौलवीने छेड काढली होती. त्या मुलीने घरी येऊन आईला सांगितले. ती सर्व घटना ऐकून आईच्या तळपायातील आग मस्तकात गेली. तिने मौलवीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

तिने थेट मशिद गाठली आणि तिकडे मौलवीला चांगलाच चोप दिला. व्हिडिओत काही पुरूषही दिसत आहेत जे त्या महिलेची मदत करताना दिसतात. १५ एप्रिलला हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३३ हजार लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. १७ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला कमेंटही दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 4:46 pm

Web Title: mother entered a mosque and beat up a maulvi who allegedly molested her 8 year old daughter
Next Stories
1 FB बुलेटीन: पेट्रोल डिझेल महागणार, पुन्हा चलन तुटवडा आणि अन्य बातम्या
2 आसाराम समर्थकांकडून पंचकुलासारख्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होऊ शकते; पोलिसांना भिती
3 ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळेच देशात आर्थिक आणीबाणी’
Just Now!
X