26 February 2021

News Flash

धक्कादायक ! प्रियकरासाठी आईने केली मुलीची हत्या

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमलं होतं

प्रतिकात्मक छायाचित्र

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात आईने आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांतून आईने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या झालेल्या तरुणीची आई, भाऊ आणि आईचा प्रियकर यांना रक्ताने माखलेल्या कपड्यांसह अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणीने तिच्या आईला अनैतिक संबंधांबाबत सर्वांना सांगण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबरच्या रात्री गळ्यावर चाकूने सपासप वार करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमलं होतं. या पथकाने चौकशीनंतर हत्येबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी तरुणीची आई संतोषी, तरुणीचा भाऊ आणि आईचा कथित प्रियकर अभिमन्यू उर्फ छोटे भैय्या यांना अटक केली आहे. नवभारत टाइम्सला पोलीस अधिकारी आलोक प्रियदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे भैय्या आणि संतोषी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होतं. महिलेच्या घरी तिच्या प्रियकराचं नेहमी येणंजाणं असायचं, आणि नेहमी नशेत तर्र होऊन तो यायचा. एकदिवस त्याने त्या तरुणीसोबतही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्या छेडछाडीचा संबंधित तरुणीने जोरदार विरोध केला आणि जर पुन्हा हा व्यक्ती आपल्या घरात आला तर मी तुमच्या नात्याबद्दल सर्वांना सांगेन अशी धमकी तिने आईला दिली होती. त्यामुळे चिडलेल्या संतोषीने आपला मुलगा आणि प्रियकरासोबत मिळून चाकूच्या सहाय्याने मुलीच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी तिघांना बेड्या घातल्या असून तुरूंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 11:23 am

Web Title: mother killed own daughter in up
Next Stories
1 पनामा पेपर्समध्ये शिवराजसिंह चौहानांचे नाव नाही, मी तर कन्फ्यूज झालो: राहुल गांधी
2 छत्तीसगडमध्ये भाजपा विरोधात नक्षलवाद्यांचे पोस्टर्स
3 विजय मल्ल्याचे हेलिकॉप्टर विकणे आहे, जाणून घ्या किंमत
Just Now!
X