News Flash

चौहान, अजयसिंह यांचे अर्ज दाखल

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सिव्होर जिल्ह्य़ातील बुधनी मतदारसंघातून अर्ज भरला.

| November 6, 2013 04:28 am

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सिव्होर जिल्ह्य़ातील बुधनी मतदारसंघातून अर्ज भरला. त्याच प्रमाणे  विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी चुऱ्हाट मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
चौहान यांनी गेल्या दोन निवडणुका या मतदारसंघातून जिंकल्या आहेत. तर काँग्रेस नेते असलेले अजय सिंह १९८५ पासून ते या मतदारसंघातून विजयी होत आहेत. १९९३ मध्ये भोजपूर मतदार संघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरलाल पटवा यांच्या विरोधात ते पराभूत झाले होते. मध्य प्रदेशमध्ये २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:28 am

Web Title: mp poll shivraj singh chouhan ajay singh file nomination papers for mp
Next Stories
1 छत्तीसगडच्या सारनगड मतदारसंघात महिलांच्याच विजयाचा इतिहास
2 मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रोहनींचे निधन
3 आयएमसीसमवेत युतीमुळे केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात
Just Now!
X