भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा लग्नसोहळा २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी उदयपूर येथे लग्न समारंभाच्या ठिकाणी तिच्या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्याोगपती मुकेश अंबानी यांनी आपली पत्नी निता हिच्यासोबत गाण्यावर ठेका धरला. आपल्या मुलीच्या लग्नाचा सोहळा खास व्हावा यासाठी अंबानी कुटुंबियांनी विशेष नियोजन केल्याचे दिसत आहे. या लग्नसोहळ्याला हिलरी क्लिंटन यांच्यासोबतच जगभरातून नामांकित व्यक्ती आणि उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. यासोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचीही या सोहळ्याला उपस्थिती असेल.

तर इशा आणि आनंद परिमल हेही गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अंबानी कुटुंबियांचे हे डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अतिशय अलिशान अशा स्टेजवर अंबानी आणि परिमल कुटुंबिय आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी डान्स केला. नुकताच अंबानी कुटुंबियांनी उदयपूर येथे ‘अन्न सेवे’चा कार्यक्रम घेतला. हा उपक्रम ७ ते १० डिसेंबपर्यंत सुरु राहणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. तर १२ तारखेपर्यंत संगीत, डान्स, मेहंदी हे कार्यक्रम रंगणार आहेत. या संगीत कार्यक्रमात इशानेही तिचा होणारा पती आनंद पिरामलसोबत अतिशय रोमॅन्टिक डान्स केला. शाहरूख खानच्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटातील ‘मितवा’ या गाण्यावर दोघांनीही ताल धरला. इशा व आनंदच्या संगीत कार्यक्रमातील या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

https://www.instagram.com/p/BrJlTUNHqSi/

आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती. इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे.