24 September 2020

News Flash

मुंबई पाण्यात बुडाली, पण सरकार काहीच करत नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले

सुप्रीम कोर्टात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना विशेष दर्जा देणारा आणि राज्यातील स्थायी नागरिकत्वाची व्याख्या सांगणारे घटनेतील कलम ३५ अ विरोधात दाखल करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (संग्रहित छायाचित्र)

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात देशभरातील राज्य सरकारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्ली व मुंबईतील परिस्थितीवरुन फटकारले. दिल्ली कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून जात असून मुंबई पावसामुळे बुडत आहे, तरीही राज्य सरकार काहीच करत नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने फटकारले.

सुप्रीम कोर्टात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. एम बी लोकूर आणि न्या. दिपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीतील ओखला, गाझीपूर या भागांमधील कचऱ्याचे डोंगर कोण हटवणार, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. याची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार की नायब राज्यपाल, असेही कोर्टाने विचारले.

दिल्ली कचऱ्याच्या डोंगराखाली दबून जात आहे. तर मुंबई पाण्यात बुडत आहे. पण तरीही सरकार काहीच करत नाही. यात कोर्टाने हस्तक्षेप केला तर न्यायपालिकेवर टीका होते, असे कोर्टाने नमूद केले. कोर्टाने १० राज्य आणि दोन केंद्रशासित राज्यांना १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला. घटकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने कोर्टाने दंड ठोठावला. तसेच सुनावणीला उपस्थित नसलेल्या राज्य सरकारच्या वकिलांनाही कोर्टाने २ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:13 am

Web Title: mumbai sinking but government does nothing says supreme court
Next Stories
1 फेसबुकला पहिला दणका , केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात 4.56 कोटींचा दंड
2 गुजरात: दोन महिन्यापूर्वी पडलेल्या पुलावरूनच जीव मुठीत धरून शाळेत जातात मुले
3 दहशतवाद्यालाच शस्त्रास्त्र पुरवून गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आयसिसचा कट
Just Now!
X