News Flash

जीएसटीचा निषेध : मुंबईतील कापड व्यापारी संपावर जाण्याची शक्यता

कापड निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर आकारलेल्या जीएसटीला विरोध

Ahmdabad : येथील व्यापारी जीएसटी विरोधात संपावर गेले आहेत.

कापड उद्योगावर लावण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला (जीएसटी) राज्यात व्यापाऱ्यांचा विरोध वाढत असून आजपासून मुंबईतील कापड व्यापारी संपावर जाण्याची शक्यता आहे.

कापडाची मोठी बाजारपेठ असणाऱ्या अहमदाबाद शहरातील कापड व्यापारी सोमवारपासूनच या नव्या करप्रणालीविरोधात अनिश्चितकाळासाठी संपावर गेले आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीतील कापड व्यापाऱ्यांनीही सोमवारपासून संप पुकारला आहे.

कापड उद्योगाच्या मुंबईत १३ घाऊक बाजारपेठा असून यांपैकी मंगलदास मार्केट, मुलजी जेठा मार्केट, स्वदेशी मार्केट आणि सिंधी मार्केट जीएसटी लागू होण्यापूर्वीच गेल्या महिन्यांत संपावर गेले होते मात्र नंतर त्यांनी हा संप मागे घेतला. कापडाच्या निमिर्ती प्रक्रियेतील प्रत्येक स्तरावर आकारण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराला कापड व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

“आमचे यंत्रमागांचे मालक हे अशिक्षित असल्याने ते निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक व्यवहारांचा हिशोब ठेऊ शकत नाहीत. ही खूपच त्रासदायक प्रक्रिया असून आमच्यासाठी ती खूपच अवघड आहे” असे भिवंडीतील यंत्रमाग संघटनेचे प्रवक्ते शारदाराम सेजपाल यांनी सांगितले. “आम्ही जीएसटीच्या विरोधात नाही मात्र, याअंतर्गत येणारा कर हा प्रत्येक टप्प्यावर न लावता सुरुवातीलाच सूतावर लावायला हवा” अशी भुमिकाही त्यांनी मांडली.

कापड निर्मिती प्रक्रियेत कापसाद्वारे तयार झालेल्या सूतापासून शेवटी प्रत्यक्ष कपडा तयार होण्यापर्यंत विविध १८ टप्पे आहेत. यामध्ये कापडाचे गठ्ठे, विणकाम, रंगकाम, छपाई, वाहतु्क यांचा समावेश आहे. यासर्व टप्प्यांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:37 pm

Web Title: mumbai textile merchants should go on strike from today for protest of gst
Next Stories
1 मोदींच्या रुपात समाजाला नवा ठेकेदार मिळाला: मोहन भागवत
2 योगी आदित्यनाथ सरकारच्या बजेटमधून ताजमहाल गायब!
3 दहशतवादी हल्ल्याचा ‘तो’ थरार बचावलेल्या भाविकांच्याच शब्दांतून…
Just Now!
X