गुरुग्राम येथे काही अज्ञात तरुणांनी २५ वर्षीय मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोब पुरा परिसरात तो राहतो.

आलम याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार परिसरात काही अज्ञात तरुणांनी त्याला घेरलं आणि घातलेल्या पारंपारिक टोपीवर आक्षेप घेतला. ‘आरोपींनी मला धमकावलं. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही असं सांगू लागले. त्यांनी माझी टोपी काढली आणि कानाखाली लगावली. यावेळी त्यांनी मला भारत माता की जय अशी घोषणा देण्यासही सांगितलं’, अशी माहिती आलमने दिली आहे.

पुढे त्याने सांगितलं की, ‘मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे भारत माता की जय घोषणा दिली. नंतर त्यांनी जय श्रीराम बोलण्यास सांगितलं, ज्यासाठी मी नकार दिला. यावेळी त्यांनी रस्त्यावरुन काठी उचलली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझे पाय आणि पाठीवर फटके दिले’.

 

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>Man who was allegedly assaulted for wearing skull cap: They said they would make me eat pork &amp; chant Jai Shri Ram &amp; Bharat Mata ki Jai. They tore my kurta when I was trying to escape. Police say, &quot;accused was reportedly drunk. It was a minor altercation. We&#39;ve registered an FIR&quot; <a href=”https://t.co/bCApKE4g5n”>pic.twitter.com/bCApKE4g5n</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1132823083717419008?ref_src=twsrc%5Etfw”>May 27, 2019</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js&#8221; charset=”utf-8″></script>

आलम याने सदर बाजार येथील मशिदीतून नमाज पठण करुन परतत असताना हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आपण मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर आपल्याच समाजातील काही लोक धावत आले. नंतर आरोपींनी पळ काढला अशी माहिती आलमने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आलमची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदतदेखील घेतली जात आहे.