३६ वर्षीय केटिया पेज Lipoedema नावाच्या डीसॉर्डरशी झुंज देत आहे. या गंभीर आजारात शरिराच्या खालच्या भागाचे वजन वाढू लागते. केटियाचे पाय एवढे सुजले आहेत की तिचा एक पाय जवळजवळ ४ फूट रुंद झाला आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वी पायांचे वजन कमी व्हावे यासाठी ती उपचार घेत आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी येथे राहाणाऱ्या पेजने लिपोसेक्शन सेशन सुरू केलं आहे. ज्यायोगे पायाच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेऊन वजन कमी करता येईल. लिपोसेक्शन शस्त्रक्रियेद्वारे शरिरातील वाढत्या वजनाच्या अवयवाचे वजन कमी करता येऊ शकते. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर पायांच्या वजनात थोडी कमतरता आल्याचे पेज म्हणाली. असे असले तरी अद्याप खूप वजन कमी करणे बाकी आहे. पेजने शस्त्रक्रिया केली नसती तर तिचा मृत्यू झाला असता अशी माहिती तिच्या डॉक्टरांनी दिली. हा आजार शरिरात एका ठिकाणी सुरू होऊन शरिरात अन्यत्र पसरत जातो. काही काळाने केटियाचे चालणे-फिरणे बंद झाले असते. हा आजार एवढा वाढला असता की त्यात तिचा मृत्यूदेखील झाला असता. आपल्या आजाराविषयी बोलताना केटिया म्हणाली की, खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्याने आपले वजन वाढले असल्याचे लोक समजतात. परंतु हा एक आजार असून मी काहीही करू शकत नसल्याचे त्यांना माहिती नाही. जीवनात एवढा कठीण प्रसंग आलेला असतानादेखील पेजची आनंदी जीवन जगण्याची इच्छा कायम आहे. ती म्हणते, मी स्मार्ट आणि सुशिक्षित आहे, मला स्वयंपाक येतो. तरीदेखील मला कोणी लग्नायोग्य समजत नसेल, तर माझ्या मते ती व्यक्ती मूर्ख आहे. आपल्या आयुष्यात कोणीतरी असून, लवकरच आपण त्याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहीत पेजने दिली. आपला होणारा पती आपल्यावर खूप प्रेम करत असल्याचे सांगत, आपल्याला आहे त्या परिस्थिती तो स्विकारण्यास तयार असल्याचे ती म्हणाली. एक वर्षापासून पेज या आजाराने ग्रस्त असून बघताबघता तिची ही अवस्था झाली.