मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना बुधवारी कोटय़वधी डॉलर्सच्या भ्रष्टाचार प्रकरणी तेथील भ्रष्टाचार विरोधी संस्थेने अटक केली आहे. आता त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात येणार आहेत. भ्रष्टाचार विरोधी संस्थेने सांगितले, की नजीब यांना त्यांच्या कार्यालयातच अटक करण्यात आली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वासघात, भ्रष्टाचार, काळा पैसा जमवून तो पांढरा करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. देशाच्या विकास निधीचा त्यांनी अपहार केला असून आपण दोषी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एसआरसी इंटरनॅशनलच्या खात्यातून त्यांनी ४२ दशलक्ष रिंगिट म्हणजे १०.३ दशलक्ष डॉलर्स स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले होते. नजीब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारे निधीची लूट केली होती. नजीब यांनी २००९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर विकास निधी स्थापन केला होता. त्यानंतर अमेरिकेतही या घोटाळय़ाची चौकशी झाली, कारण यातील काही पैशाची गुंतवणूक तेथे झाली होती. नजीब यांनी त्यांच्या सरकारमधील टीकाकारांना काढून टाकले होते. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून चौकशीला लगाम घातला होता. भ्रष्टाचारामुळे त्यांच्या विरोधात संतापाची लाट होती. त्यामुळे ९ मे रोजी नजीब यांच्या सत्ताधारी आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Najib razak arrested by malaysias anti graft agency
First published on: 20-09-2018 at 00:55 IST