पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नुकताच मेट्रोन प्रवास केला. नरेंद्र मोदींनी एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रोने प्रवास केला. धौला कुआ ते द्वारकादरम्यान त्यांनी हा प्रवास केला. तिथे त्यांनी इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन अॅण्ड एक्स्पो सेंटरचं भूमीपूजन केलं. याआधीही नरेंद्र मोदींनी अनेकदा मेट्रोने प्रवास केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास १८ मिनिटांचा होता. मेट्रोमध्ये नरेंद्र मोदींना पाहिल्यानंतर प्रवासी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. नरेंद्र मोदींनीही प्रवासादरम्यान काही प्रवाशांसोबत बातचीत केली.

याआधीही नरेंद्र मोदींनी अनेकदा मेट्रोने प्रवास केला आहे. याचवर्षी जुलै महिन्यात नोएडा येथे सॅमसंगच्या प्लांटचं उद्धाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी मेट्रोने नोएडाला पोहोचले होते.

14 सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. स्वच्छता श्रमदानासाठी जात असताना जाणाऱ्या मार्गावर कोणतीही विशेष व्यवस्था किंवा बॅरिअर लावले नसल्याने मोदींचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. जाणाऱ्या मार्गावर कोणतीही विशेष व्यवस्था नसतानाही नरेंद्र मोदी ताफ्यासहित स्वच्छता श्रमदानासाठी निघाले होते. त्याआधी सकाळी नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाला सुरुवात केली. वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर मोदींनी पहाडगंज येथील बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या आवारात साफसफाई केली होती.