News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदेचे टीकास्त्र आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित राहणार

परप्रांतियांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणारे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे प्रमुख राज ठाकरे हे लवकरच उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. वाचा सविस्तर : 

छत्रपतींचा ‘रायगड’ कात टाकतोय..

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडवर सुरू असलेली कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये रायगडचे बदललेले रूप पाहायला मिळेल असा विश्वास रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. वाचा सविस्तर :

‘कोकाकोला’सह इतर कंपन्यांचा महाराष्ट्राबाहेर जाण्याचा इशारा

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने (महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआर) चालू वर्षांपासून पिण्यासाठी, औद्योगिक, सिंचनाच्या पाण्याच्या दरामध्ये वाढ केली आहे. औद्योगिक प्रयोजनासाठी तब्बल २० टक्के वाढ केल्याने कोकाकोला कंपनीने थेट महाराष्ट्रातून काढता पाय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वाचा सविस्तर :

आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारा, मग अयोध्येकडे लक्ष द्या

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदेनेही हल्ला चढविला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे आणि मग अयोध्येकडे लक्ष द्यावे, असे टीकास्त्र परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. विष्णू कोकजे यांनी सोडले आहे. वाचा सविस्तर :

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 10:11 am

Web Title: national and state top 5 news of the day
Next Stories
1 वाराणसीमध्ये मोहन भागवत मोदींची भेट घेण्याची शक्यता
2 पेट्रोलच्या दरात १७ पैशांची कपात, डिझेलचे दरही घटले
3 छत्तीसगड निवडणूक: पहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदान
Just Now!
X