पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी मिळालेल्या अधिकृत निमंत्रणानंतर नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले आहेत. पाकिस्तानला रवाना होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचले. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला जात आहोत, जेणेकरुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील असं त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं की, ‘मी एक सदिच्छ दूत म्हणून पाकिस्तानला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील या अपेक्षेने मी जात आहे’. माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासहित सुनील गावसकर आणि कपील देव यांनाही इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी निमंत्रण मिळालं आहे.

पाकिस्तानला पोहोचल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवज्योत सिंग सिद्धू बोलले की, ‘मी एक राजकीय व्यक्ती म्हणून येथे आलेलो नाही. मी प्रेम आणि शांतीचा सदिच्छा दूत म्हणून आपल्या मित्राकडे आलो आहे’. ‘इम्रान खान यांना खेळताना आपल्या कमतरतेला सामर्थ्य बनवताना मी पाहिलं आहे. आज पाकिस्तानला याची गरज आहे’, असंही ते म्हणाले आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या इम्रान खान यांच्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक खास भेटही आणली आहे. याबद्दल विचारलं असता आपण त्यांच्यासाठी एक काश्मीरी शॉल आणली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे प्रेमाचं प्रतीक असून आपल्यालाही प्रचंड आवडते असं त्यांनी म्हटलं आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot singh sidhu reach pakistan to attent imran khan swaring in ceremony
First published on: 17-08-2018 at 17:56 IST