अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत आणि पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे अरुणाचल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) यांनी ठरविले आहे.
सदर दोन्ही निवडणुकांसाठी संयुक्त उमेदवारी देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे ३० सदस्यांच्या पालिकेसाठी जागावाटपही करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील काँग्रेसच्या राजवटीमुळे जनतेला नैराश्याने ग्रासले असल्याने नवा पर्याय देण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले असल्याचे मीडिया सचिव कालिंग जेरांग यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2013 रोजी प्रकाशित
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, पीपीए एकत्र
अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत आणि पालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे अरुणाचल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) यांनी ठरविले आहे.
First published on: 21-04-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp aam aadmi parti and ppa togather in arunachal pradesh