News Flash

वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात ६०,००० बालकांचा जन्म, सर्वाधिक बालकांचा जन्म झालेल्या देशांमध्ये भारत अव्वल

जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म

(प्रतिकात्मक छायाचित्र)

भारतामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज अधिक व्यक्त करण्यात आला होता. मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही युनिसेफने म्हटलेलं. मात्र यंदा भरतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.

नवीन वर्षाच्या आगमानाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असंही युनिसेफने म्हटलं आहे. भारतामधील बालकांचे सरासरी वयोमान हे ८० वर्षे ९ महिने इतकं असेल असंही यात नमूद करण्यात आलं आहे. तुलनात्मकरित्या सांगायचं झाल्यास यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बलाकांची संख्या ही २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा ७८ पटींनी जास्त असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:26 am

Web Title: new year day 2021 60000 babies in india 3 lakh 70000 globally expected to be born scsg 91
Next Stories
1 आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा
2 नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं राष्ट्रवाद नव्हे – सचिन पायलट
3 पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून ११ कोळसा खाण कामगारांची अपहरण करुन हत्या
Just Now!
X