22 September 2020

News Flash

भारताबरोबरच केलं होतं या देशाने लॉकडाउन, आज १०० दिवसांमध्ये तिथे एकही नवा रुग्ण नाही

इतर देशांसमोर ठेवला आदर्श

संग्रहित छायाचित्र

जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. जगभरात २० कोटींच्या जवळपास करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सात लाख तीस हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक कोटी २७ लाख ३७ हजार ६८९ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण करोनाचा प्रादुर्भाव अद्याप तसाच आहे. याउलट अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे. trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जगातील इतर देशांपुढे न्यूझीलंडनं आज एक आदर्श ठेवला आहे.

न्यूझीलंडने यशस्वीपणे करोनाविरोधात लढा दिला आहे. पण न्यूझीलंडजवळ असलेल्या व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिवसागणिक करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा फटका न्यूझीलंडला बसण्याची शक्यता आहे. ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या न्यूझीलंडने करोनावर यशस्वी मात करत जगाला आदर्श दाखवून दिला आहे. न्यूझीलंड सध्या जगातील सर्वात सुरक्षित देश आहे. न्यूझीलंडमधील नागरिक सध्या सर्वसामान्य जीवन जगत आहे. पण, चिंतेची बाब म्हणजे येथील लोक सध्या चाचणी करण्यास नकार देत आहेत. तसेच कोविड संदर्भातील सरकारी अ‍ॅप्सचा वापरही करत नाही. यात भर म्हणून मुलभूत स्वच्छतेच्या नियमांची पायामल्लीही करत आहेत. यामुळे न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी मागील १०० दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 4:36 pm

Web Title: new zealand records 100 days without domestic case nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण : निलेश राणेंनी शिवसेनाच्या ‘या’ मंत्र्याकडे राजीनाम्याची मागणी
2 “राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचं नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बनवा”
3 पाकिस्तानातून राजस्थानात आलेल्या ११ निर्वासितांचा मृत्यू
Just Now!
X