ऑस्ट्रेलियातील वणव्यामुळे न्यूझीलंडच्या आकाशाचा रंग बदलला आहे. न्यूझीलंडचं आकाश या वणव्यामुळे भगवं झालं आहे. आगीची झळ, धूर या सगळ्याचा परिणाम न्यूझीलंडच्या आकाशाच्या रंगावर झाला आहे. एरवी आपण पाहतो तेव्हा या मोसमात आकाश निरभ्र असतं. मात्र ऑस्ट्रेलियात जो वणवा पेटला त्याचा परिणाम न्यूझीलंडच्या आकाशावर आणि वातावरणावरही झाला. या आगीचा धूर २ हजार किमी परिसरात पसरला. रंग बदलल्याने त्याचा परिणाम हवेवरही झाला. ऑस्ट्रेलियातील आगीच्या धुराचे थर न्यूझीलंडच्या आकाशावर पसरले.

 

 

भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊत वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास ४८ कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमावावा लागला. न्यू साऊथ वेल्स या राज्याला या वणव्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारत दौरा रद्द केला आहे. ऑस्ट्रेलियातील वणवा हा जागतिक वातावरणीय बदलांचं प्रतीक आहे असं इथल्या पर्यावरण अभ्यासकांनी म्हटलं आहे. आगीमुळे ऑस्ट्रेलियातली तापमानही वाढलं आहे.