अरुणाचल प्रदेशमधील आमदारपुत्राचा लाजपतनगर येथील दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी शनिवारी येथे पूर्वेकडील विद्यार्थ्यांच्या एका गटाने जोरदार निदर्शने केली.
लाजपतनगरमधील काही दुकानदारांनी निदो तानिया या आमदारपुत्राची त्याच्या केशरचनेवरून टिंगल केली होती. त्याचा राग आल्याने निदो तानिया याने त्यांना जाब विचारला असता निदो याला दुकानदारांनी बेदम मारहण केली. त्यामध्ये निदो मृत्युमुखी पडला.
लाजपतनगर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या निदर्शकांनी पोलिसांविरुद्ध  घोषणाबाजी केली. निदो तानिया हा अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निदो पवित्र यांचा मुलगा असून त्याला फरहान आणि अक्रम या दोन दुकानदारांनी जबर मारहाण केली.