येत्या २० तारखेला जितनराम मांझी सरकार विश्वासमताला सामोरे जाणार असताना जनता दल (यू) आणि मित्रपक्षांनी एकतेचे प्रदर्शन करत राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेसाठी बिहारचे राज्यपाल व भाजपवर टीका केली.
भाजपच्या सांगण्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी  जितनराम मांझी यांना विश्वासदर्शक ठरावासाठी मोठी मुदत दिल्यामुळे बिहार  राजकीय अस्थिरतेत लोटला गेला आहे, असे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री एकापाठोपाठ एक लोकप्रिय घोषणा करत असल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर विपरीत परिणाम होणार असल्याचा आरोप केला.