News Flash

नितीशकुमार भाजपच्या संपर्कात ?, भाजपच्या नेत्याची घेतली भेट

जदयू आणि राजदमधील संबंधात कटूता वाढल्याचे दिसून येत आहे.

Nitish Kumar : नितीशकुमार यांनी भाजपच्या एका नेत्याची भेट घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतूक केले होते. यापूर्वीही नितीशकुमार यांनी या निर्णयाचे जाहीररित्या स्वागत केले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपच्या एका नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार नितीशकुमार भाजपच्या संपर्कात असून एका मोठा नेत्याबरोबर त्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर जदयू आणि भाजप यांच्यात पुन्हा जवळकीता निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती.
टीव्ही वृत्तानुसार नितीशकुमार यांनी भाजपच्या एका नेत्याची भेट घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतूक केले होते. यापूर्वीही नितीशकुमार यांनी या निर्णयाचे जाहीररित्या स्वागत केले होते. गेल्या काही दिवसांपासून जदयू आणि राजदमधील संबंधात कटूता वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: राजदचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसादसिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला होता.
नितीशकुमार यांची निश्चय यात्रा बेकार असल्याची टीका त्यांनी केली होती. दुसरीकडे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मात्र नोटाबंदी हे बनावट सर्जिकल स्ट्राईक असल्याचा आरोप केला होता. या दोन्ही मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे एकाच विषयावरील टोकाच्या मतांचा राज्य सरकारवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितीशकुमार यांची ५०० व १००० हजार रूपयांची नोट बंद करण्याची मागणी जुनी असल्याचा खुलासा जदयूचे महासचिव के. सी. त्यागी यांनी केला होता. मोदींनी त्यांची मागणी पूर्ण केल्यामुळे नितीशकुमार नोटाबंदीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचे समर्थन करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजप आणि जदयू जवळ येत असल्याचा चुकूनही अंदाज बांधू नका, असेही सांगण्यास ते विसरले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 10:37 pm

Web Title: nitish kumar talk to bjp leader says media report
Next Stories
1 इराकमधील आत्मघाती बॉम्बस्फोटात ८० जणांचा मृत्यू
2 भारताच्या ५०० व २००० रूपयांच्या नव्या नोटांवर नेपाळमध्ये बंदी
3 …तर आम्ही मोदींच्या चरणी लोटांगण घालू- केजरीवाल
Just Now!
X