बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सौहार्दाचे संबंध नाहीत. मात्र बिहारला वादळाचा तडाखा बसल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने प्रतिसाद देऊन मदतीचे आश्वासन दिले, त्याबद्दल नितीशकुमारांनी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत नितीशकुमार यांनी वादळाचा फटका बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली. यामध्ये दगावलेल्यांची संख्या ५५ वर गेली आहे. हवाई दौऱ्यावेळी भाजपचे बिहारमधील केंद्रातील मंत्री रविशंकर प्रसाद, राधामोहन सिंह तसेच सुशीलकुमार मोदी उपस्थित होते. बिहारला केंद्राकडून मदत दिली जाईल, असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिले.