ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय कायदा मंत्री व भाजपा नेते रविशंक प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, जेव्हापण तुम्ही सैन्याशी संबधित व्यवहारातील किकबॅकबाबत ऐकता तेव्हा तुम्हाला काँग्रेसची आठवण येईल. यूपीए सरकारमध्ये विना किकबॅक कोणतचं काम होत नव्हतं. ‘डील’शिवाय कुठलंही डील होत नव्हतं, काँग्रेस नेत्यांच्या ‘कट’शिवाय कंत्राट दिलं जात नव्हतं.

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहार प्रकरणी आरोपी राजीव सक्सेनाने चौकशीत कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी, त्यांचा मुलगा बकुल नाथ, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि अहमद पटेल यांचं नाव घेतलं आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, जेव्हापण तुम्ही सैन्याशी निगडीत व्यवहारात एका किकबॅक बद्दल विचार करता, तेव्हा काही काँग्रेस नेत्यांची आठवण येते. बोफर्सपासून सबरमरीन घोटाळा आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरपासून जीप घोटाळ्यापर्यंत यूपीए सरकारमध्ये विना किकबॅक कोणतेच काम होत नव्हते. ‘डील’शिवाय कुठलंही डील होत नव्हतं, ‘कट’शिवाय कंत्राट दिलं जात नव्हतं, काँग्रेस नेत्यांच्या ‘कट’शिवाय कंत्राट दिलं जात नव्हतं.