ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये नव्या इमिग्रेशन विधेयकामुळे पसरलेली अस्वस्थता लक्षात घेत पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा घालण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र स्थलांतरितांवर ‘नजर’ ठेवणे आवश्यक असून त्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील राहील, असे आवर्जून नमूद केले.
मान्यताप्राप्त पद्धतींनी आणि न्याय्य मार्गाने ज्या गुणवान विद्यार्थ्यांना येथील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला आहे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईलच. पण त्याचबरोबर, ज्यांनी अवैध मार्गानी प्रवेश मिळवलेला आहे अशांवर करडी ‘नजर’ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्याचे पालन काटेकोरपणे केले जाईल, असे कॅमेरून यांनी सांगितले.
 खऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात कोणतीही अडचण नव्या कायद्यामुळे निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊ असे आश्वासनही ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिले. बरेच विद्यार्थी येथे रोजगाराच्या संधी साधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांनी नोकरी मिळवताना त्यांनी पदवीशी संबंधित नोकऱ्याच पटकवव्यात, अन्यत्र उडय़ा मारू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यासही कॅमेरून विसरले नाहीत.