अनुदानित सिलिंडर्सची संख्या ९ वरून १२ केल्याचे जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर आता आणखी एक खुशखबर सामन्य नागरिकांनी मिळाली आहे.
विना-अनुदानित सिलिंडर्सच्याही किंमतीत १०७ रूपयांची घट करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी एक १४.२ किलो घरगुती विना-अनुदानित सिलिंडर १,२४१ रु.ना मिळत होता. आता त्यात १०७ रूपयांची घट होणार असून हा विना-अनुदानित सिलिंडर १,१३४ रूपयांना मिळणार आहे. त्यामुळे महागाईचे चटके सोसणाऱया सामन्यांना त्यातल्यात्यात या बातमीने दिलासा मिळाला आहे.
परंतु, दुसऱया बाजूला डिझेल वाहन चालकांच्या खिशाला प्रतिलिटर मागे ५० पैशांची चाट पडणार आहे. कारण, डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दर महिन्याला डिझेलच्या किंमतीत ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या(१ फेब्रुवारी) पासून डिझेलच्या किंमतीत ५० पैशांची वाढ होईल.