ईशान्य भारतातील आठ अतिरेकी संघटनांच्या ‘युनायटेड पीपल्स फ्रन्ट’ने केंद्र सरकारशी शुक्रवारी शांतता करार केला. मिझो नॅशनल फ्रन्टचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तसेच या संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारानुसार परस्परांवरील हल्ल्यांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
‘युनायटेड पीपल्स फ्रन्ट’मध्ये कुकी नॅशनल फ्रन्ट, झोमी क्रांतीकारी दल, कुकी क्रांतीकारी दल, झोमी संरक्षण दल, संयुक्त कुकी मुक्ती संघटना, कुकी क्रांतीकारी संघटना, झोमी संरक्षण स्वयंसेवक आणि मार पीपल्स कन्वेन्शन (डेमोक्रॅटिक) यांचा समावेश आहे.
दरम्यान, जवानांवरील हल्ल्याला जबाबदार असलेल्या एनएससीएन – के या संघटनेवर बंदी घालण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.