24 September 2020

News Flash

वसुंधरा राजेंबरोबरच्या मतभेदाच्या मुद्यावर अमित शाह म्हणाले….

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. ते पंचायत आजतक कार्यक्रमात बोलत होते. वसुंधरा राजे आणि तुमच्यामध्ये मतभेद आहेत का ? या प्रश्नावर शाह म्हणाले की, आमच्यामध्ये कुठलीही अंतर्गत स्पर्धा नाही.

वसुंधरा राजे यांनी कधीही पक्षादेश झुगारलेला नाही. त्यांनी नेहमीच पक्षाच्या निर्णयांचे पालन केले आहे असे ते म्हणाले. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार महत्वाच्या टप्प्यावर असताना अमित शाह यांनी वसुंधरा राजेंबरोबरच्या मतभेदाच्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरला एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकांकडे पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2018 11:39 am

Web Title: not any diffrences with vasundhara raje amit shah
टॅग Vasundhara Raje
Next Stories
1 कोळसा घोटाळा: माजी सचिव एच सी गुप्तांसह पाच दोषी
2 मराठ्यांना आरक्षण मिळू शकते तर पाटीदारांना का नाही?: हार्दिक पटेल
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X