ज्येष्ठ विचारवंत, राजकीय अभ्यासक आणि ‘स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’चे (सीएसडीएस) संस्थापक रजनी कोठारी यांचे सोमवारी निधन झाले. पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज, दि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च आणि दि इंटरनॅशनल फाऊण्डेशन फॉर डेव्हलपमेण्ट ऑल्टरनेटिव्हज या संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्याचप्रमाणे भारतीय राजकारण आणि समाजकारण यांचा गाढा अभ्यास होता.
कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू दि फ्युचर, डायग्नोसिस ऑफ दि प्रेझेण्ट वर्ल्ड अ‍ॅण्ड ए डिझाइन फॉर एॅन ऑल्टरनेटिव्ह, पॉलिटिक्स इन इंडिया आदी पुस्तके गाजली आहेत. अनइझी इज दि लाइफ ऑफ माइण्ड हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक २००२ मध्ये प्रकाशित झाले.