जिनिव्हा येथे सुरू झालेली आण्विक अस्त्रांवरील चर्चा फिस्कटण्यामागे इराणचा हात असल्याचा अमेरिकेकडून केला जाणारा आरोप पूर्णपणे खोटा असून चर्चा निष्फळ होण्यास आम्ही जबाबदार नसल्याचा दावा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर ही चर्चा उधळून लावण्याचे खरे ‘श्रेय’ फ्रान्सला मिळायला हवे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी हाणला.
अबुधाबी येथे बोलताना सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनी ‘आर्थिक र्निबध उठविण्याच्या मोबदल्यात इराणला आपला आण्विक कार्यक्रम खुला करण्यास भाग पाडण्यात अमेरिकेला यश येत होते, मात्र आयत्या वेळी इराणने माघार घेतल्याने ही चर्चा निष्फळ ठरली’, असा आरोप केला होता.
मात्र या आरोपाचे खंडन करताना इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी फ्रान्सला चर्चा फिस्कटवण्यास जबाबदार धरले. ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रतिक्रियेत झरीफ यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेंट फॅबिअस यांच्या वक्तव्यांमुळे परिषद उधळली गेली, असा दावा केला. तसेच ‘अमेरिकेने तयार केलेल्या मसुद्यातील निम्म्याहून अधिक मजकूर गुरुवारी बदलणारे आणि शुक्रवारीच परस्परविरोधी विधाने करणारे परराष्ट्र मंत्री इराणचे होते का,’ अशी पृच्छाही झरीफ यांनी केली आहे.
प्रकरण नेमके काय?
गेल्या आठवडय़ात गुरुवारी जिनिव्हा येथे परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आण्विक कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती. फ्रान्सचे फॅबिअस परिषदेस शुक्रवारी उपस्थित राहिले, मात्र सुरुवातीस प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘अद्याप कोणत्याही मुद्दय़ावर सहमती किंवा एकमत झालेले नाही’, असा दावा त्यांनी केला. तसेच शनिवारी ‘प्राथमिक मसुदाच आपल्याला मान्य नसल्याचे’ विधान त्यांनी फ्रान्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत केले होते. या परिषदेस इराणव्यतिरिक्त ‘पी ५ + १’ म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया, चीन आणि जर्मनी हे देश उपस्थित होते.

israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार