27 October 2020

News Flash

‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती’; पतीने विचारलेल्या प्रश्नावर नुसरत जहाँ अवाक्

नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे.

नुसरत जहाँ, निखील जैन

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्यासोबत लग्न केलं. संसदेच्या बजेट सेशनमध्ये त्यांनी भाषणसुद्धा केलं. नुसरत जहाँ यांच्यासोबतच मिमी चक्रवर्तीसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या दोघांनी नुकतंच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. विशेष म्हणजे नुसरत जहाँ यांच्या पतीलाही या मुलाखतीत प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.

‘कुटुंब किंवा आतापर्यंत तू जशी जगत आलीस ती लाइफस्टाइल यापैकी एखादी गोष्ट तुला निवडायची असेल तर तू काय निवडशील,’ असा प्रश्न निखिल यांनी विचारला. त्यावर नुसरत जहाँ म्हणाल्या, ‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. पण माझ्यासाठी कुटुंब हे प्राधान्य असेल. या कुटुंबाचा आता विस्तार होत आहे. हा परिवार खूप मोठा होत आहे आणि मला सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखायचे आहे. यामध्ये तुम्हालाही माझी मदत करावी लागेल.’

यावेळी नुसरत आणि मिमी यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबतही मत मांडलं. ‘टिकटॉक व्हिडीओ तरुणाईलाही खूप आवडते आणि जर आम्ही एखादा व्हिडीओ केला तर त्यात गैर काय,’ असंही नुसरत म्हणाल्या. त्याचबरोबर संसदेबाहेर फोटो काढून आम्ही कोणताच नियम मोडला नसल्याचं मिमी चक्रवर्ती यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:56 am

Web Title: nusrat jahan surprised over a question asked by her husband ssv 92
Next Stories
1 भारताच्या निषेधानंतर ट्रम्प यांच्या विधानावर अमेरिकेची माघार
2 के. सिवान: शेतकऱ्याचा मुलगा ते ‘चांद्रयान-२’चे नेतृत्व करणारे इस्रोचे अध्यक्ष
3 ‘या’ राज्यात खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण
Just Now!
X