पॅण्टॅगॉनने गुरुवारी जाहीर केलेल्या अमेरिकी अर्थसंकल्पामध्ये पुढील वर्षांच्या लष्करी खर्चात कोणतीही कपात सुचविण्यात आलेली नाही. हे करताना अफगाणिस्तानच्या युद्धावरील खर्च हिशेबात घेण्यात आलेला नाही. संरक्षण विभागातील विविध तरतुदींसाठी सन २०१३ प्रमाणेच ५२६.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सची तरतूद असावी, अशी विनंती अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. शस्त्रास्त्रांवरील खर्चामधील कपातीशिवाय ही तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. आगामी वर्षांत सुमारे ६,९९५ बॉम्बसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.