News Flash

ओदिशात चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान

या चकमकीबाबत सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  

संग्रहित छायाचित्र

ओदिशातील मलकानगिरी येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळी आता शोधमोहीम सुरु असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

मलकानगिरीतील कालीमेडा येथे सोमवारी पहाटे नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीबाबत सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, नक्षलग्रस्त भागात आता चकमकीचे प्रमाणही वाढले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 10:14 am

Web Title: odisha five naxals killed in encounter with security forces in malkangiri
Next Stories
1 VIDEO: पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा, स्वदेशीचा नारा
2 ‘मनेका गांधींचे प्राणिप्रेम मान्य,पण हल्ल्यातील मृत महिलांचाही विचार करावा लागतो’
3 ‘मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे इस्लामविरोधी’
Just Now!
X