मलकानगिरी जिल्ह्य़ातील जंगलात शनिवारी सकाळी सुरक्षारक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १४ नक्षलवादी ठार झाले, तर एका बंडखोराला पकडण्यात आले आहे.
छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्य़ात २५ मे रोजी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला चढविण्यात आला होता. त्यामध्ये विद्याचरण शुक्ल, महेंद्र करमा आणि अन्य १९ जण ठार झाले होते. सुरक्षारक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत शनिवारी ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा या हत्याकांडात हात असल्याचा संशय आहे. छत्तीसगडच्या सीमेनजीक नक्षलवादी दबा धरून बसल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षारक्षकांच्या संयुक्त पथकाने पडिगा परिसरातील सिलाकुटा जंगलात छापे टाकले. सुरक्षारक्षकांना पाहताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल रक्षकांनी केलेल्या गोळीबारात १४ नक्षलवादी ठार झाले.